सत्यशोधक वर्धापन दिन आयोजन समिती, छत्रपती संभाजीनगर च्या सर्व सन्माननीय प्रतिनिधीचें आभार.. धन्यवाद…
आजची समता दिंडी तुफान यशस्वी झाली…
सर्वांनी वाटून घेतलेल्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्यात.
विशेष म्हणजेच पाऊस असतांना सुद्धा कुणीही दिंडी सोडून गेलं नाही…
झेंडा, मशाल, आकर्षक बॅनर, लेकरांच्या वेशभुषा, वाजंत्री, बालवयोगटापासून ते 80 पर्यंतचे सत्यशोधक उपस्थित होते..
वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांमुळे तर खूपच रंगत आली…
महिला भगिनींनी सुद्धा खूप जल्लोष केला..
शहरातील तमाम विचारवंत, लेखक, कार्यकर्ते यांची उपस्थिती…
घोषणा तर गगनभेदी होत्या…
शाळेचे लेकरं तर सकाळ पासून घराबाहेर होते तरी त्यांच्यात उत्साह भरभरून होता..
आपल्या दिंडीची लांबी जवळपास 1 कीलोमिटर होती…
सर्वांचे आभार… धन्यवाद…
लवकरच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा घेण्यात येतील…
धन्यवाद 🙏🏼🌹